नेशन न्यूज मराठी टीम.
गोंदिया / प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये महिलांचे दागिने चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून यापूर्वीही पाच महिलांना चोरी करताना रंगे हात पकडल्याची घटना घडली होती. पुन्हा देवरी येथे रक्षाबंधनाच्या निमित्त आलेले अनेक महिला या खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून येत असतात. आणि परत जात असताना बसचा वापर करतात. त्याच बसमध्ये चढत असताना आमगाव येथील एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याची घटना घडली.
महिलेच्या लक्षात आल्यानंतर याविषयीची माहिती बस स्थानकावर दिली. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या साध्या गणवेशातील असलेल्या पोलिसांना याविषयी माहिती मिळाली. त्यांनी लगेच परिसरातील महिलांची महिला पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. आणि पुन्हा एक महिला तिच्याकडे चोरीचे दागिने मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
देवरी परिसरात सध्या महिला चोरांचा हा धुमाकूळ असून बस मधील गर्दीच्या वेळी चोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. आणि यामुळे देवरी पोलिसांनी आपली गस्त बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गोपनीय पद्धतीने राबवली आहे. त्यामुळेच आज पुन्हा एकदा चोरी करताना महिलेला अटक करण्यात आली. आता तरी परिवहन विभाग बस स्थानकाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावेल अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.