नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक /प्रतिनिधी – नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाला. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसचा मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे.
आज सकाळी वणी येथे एस महामंडळाची बस दरीत कोसळून अपघाताची घटना घडली. यातील 17 जखमी प्रवाशांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुशीलकुमार झा यांनी दिली. तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना देखील आरोग्य मंत्र्यांनी दिल्याची माहिती डॉ. झा यांनी दिली.
सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. काल सकाळी साडेनऊ वाजताची सुमारास खामगाव येथून सप्तशृंगी गडावर प्रवाशांना घेऊन गेली होती. आज सकाळी सप्तशृंगी येथून प्रवासी घेऊन येत असताना बस चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली यामध्ये बस मधील प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तेथील रुग्णालयामध्ये दाखल केले. सदर बस मध्ये खामगाव येथील बस चालक गजानन टपके व वाहक पुरुषोत्तम टिकार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती संदीप पवार आगर व्यवस्थापक, खामगाव यांनी दिली.