नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जळगाव/प्रतिनिधी – मे महिना संपायला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळेच पावसाचे आगमन होण्याआधी शेतकऱ्यांची गडबड सुरू झाल्याचे चित्र आहे. गुरांसाठी बाजरी, ज्वारी, मक्याच्या कडबा पासून कुट्टी तयार केली जात आहे. पावसाळा संपेपर्यंत हा सुका चारा गुरांना पुरविला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांकडे असलेला बाजरी, ज्वारी मक्याचा कडबा घेऊन त्या कडब्याची बारीक कुट्टी करून साठवली जातो.
जनावरांच्या आहारात ओल्या बरोबर सुक्या चाऱ्याचाही समावेश असतो. पाऊस येईपर्यंत हिरवा चारा उपलब्ध होईपर्यंत कडब्यापासून तयार केलेल्या कुट्टीचा वापर गुरांसाठी केला जातो. त्यासाठी शेतकरी शेतात असलेल्या कडबा यंत्रणाच्या साह्याने बारीक करण्यात व तो चारा साठवण्यात सध्या मग्न आहेत. ज्या भागात चाराची टंचाई आहे अशा भागातील शेतकरी कडबा घेऊन गुरांसाठी चारा साठवणूक करत आहे.