Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
कृषी चर्चेची बातमी बिंदास बोल

पपईचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्न

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी जशी जगभरात प्रसिद्ध आहेत तशीच येथील पपईला सुद्धा बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळेच चोपडा तालुक्यात पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भागातील शेतकरी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून व्यवस्था होत असते. परंतु एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये लखलखत्या उन्हापासून पपईचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पपईच्या रोपट्याला क्रॉप कव्हर लावले आहे. परंतु यावर्षी उन्हाचा तडाखा जबरदस्त असल्याने क्रॉप कव्हर लावून देखील पिकांवर त्याचा दुष्परिणाम होत आहे.

वीज पुरवठा अनियमित होत असल्याने पपईच्या (Papaya) पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. त्यातही अनियमितता असल्यामुळे पपईचे रोप सुकायला लागत असल्याची माहिती चोपड्यातील शेतकरी सुरलचंद जैन यांनी दिली आहे. शेतातील उभं पीक डोळ्यासमोर जळताना पाहण्याची ताकद शेतकाऱ्याकडे आता उरली नाही आहे. तरी तो आपल्या लेकरासारख्या पिकाला वाचवण्यासाठी धडपड करत आहे. फळ बागेला फवारणीचे डोस देऊन, खत टाकून, पाणी देऊन पिकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Translate »
X