नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – चोपडा तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून युरिया खताची टंचाई शेतकऱ्यांना भासत आहे. गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांनी संयमाने त्या टंचाईला तोंड देखील दिलेले आहे. येत्या काही दिवसांमध्ये युरिया खताची टंचाई दूर होईल शेतकऱ्यांनी इतर खतांसोबत नॅनो युरियाचा देखील वापर करावा असे पंचायत समितीचे कृषी अधिकारी डीएम शिंपी यांनी सांगितले.
युरिया खताचा पहिला डोस शेतकऱ्यांचा दिला गेला आहे. आता फक्त दुसरा डोस देण्याचं बाकी आहे, त्यासाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून देण्यात येईल, असे यावेळी सांगितले.