नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – कांदा निर्यात भाव ४० टक्के वाढ झाल्यावे पडसाद सर्वत्र दिसून येत आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कांदा मालासंदर्भात चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून कांदा लिलाव बंद करून ,माजी आमदार सुरेश कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा घेऊन थेट मुंबई आग्रा महामार्ग येथे वळविण्यात आला.
त्या ठिकाणी मोर्चा मध्ये शासनाच्या विरोधात घोषणाबाजी देत मोर्चा जवळपास दोन घंटे सुरू असताना रोडवरील वाहतूक जवळजवळ दहा ते बारा किलोमीटर दूरवर वाहनाच्या रांगा लागल्या असून यावेळी मोर्चाला काही काळातच वेगळं स्वरूप मिळाले. त्यामध्ये प्रहारच्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांनी दमदाटी करून त्यांना आपल्या पोलीस व्हॅन मध्ये घेऊन पोलीस ठाण्यात रवाना केले.
यावेळी शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळावा या संदर्भात ही मागणी होती. यावेळी काही शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच दत्तू ठाकरे उर्दूळ येथील शेतकरी यांनी गळ्यात माळा घालून शासनाचा निषेध केला.