नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
बीड/प्रतिनिधी– शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात बीडमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. टाळ मृदुंगाचा गजर करत किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात असून जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. शासन दुष्काळ जाहीर करताना निकष लावत आहे. शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जावी या मागणी करता जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला आहे.
तसेच शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा देऊन दिवाळी गोड करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जेलभरो आंदोलन करू असा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे.