नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
नांदेड/प्रतिनिधी– मार्च 2023 मध्ये वादळी वाऱ्याच्या पावसाने किनवट तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये मका, ज्वारी, तीळ, गहू व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामेही केले.
यामध्ये काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले तर काही शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत अनुदान न मिळाल्याने संतप्त होऊन आज नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील जलधारा फाटा येथे 25 गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र रास्ता येत रोको आंदोलन केले आहे. हे रस्ता रोको आंदोलन जवळपास एक ते दीड तास सुरू असल्याने वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.