नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर / प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागातील अनेक गावांमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने काही भागात पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. ज्या भागात खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या त्या भागात साधारणपणे दीड ते दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन,बाजारी,मका,कडधान्य आदी पिके आता पाण्यावाचून करपू व सुकु लागली आहेत.आज पाऊस पडेल, उद्या पाऊस पडेल या अपेक्षावर शेतकरी पावसाची दररोज वाट बघतो आहे.मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या हाती घोर निराशा लागली आहे,यामूळे शेतकरी हावलदिल झाले आहेत.
हवामान तज्ञांनी यांनी देखील पंधरा दिवसांत संगमनेरमध्ये दोनदा येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी बोलताना काही संभाव्य तारखा देऊन पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तो फॅाल ठरत चालला आहे. पावसाची आस लागलेल्या शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास आता पावसाआभावी हिरावला जाताना दिसतो आहे. शासनाने यंदा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. यावेळी तालुक्यातील चिंचोली गुरव येथील शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केले आहेत.