नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – जी २० च्या बैठका भारतात होत आहेत. त्या निमित्ताने विविध करार व तंत्रज्ञान ,प्रगती याबाबत आपण बोलतो पण अजूनही नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्यासाठी आपली शासकीय ,प्रशासकीय यंत्रणा पुरेशी सज्ज नाही हे सामान्य नागरिकास अनुभवायला येते. खेडेगावात रस्ते ,पाणी ,शिक्षण आरोग्य या सारख्या पायाभूत सुविधा पुरेशी उपलब्ध नसल्याने आपत्तीच्या काळात स्थानिक लोकांना जीव मुठीत घेवून दैनंदिन जीवन जगावे लागत आहे. नुकतीच अमरावती येथे अशी घटना घडली.
अमरावती जिल्ह्यामध्ये काल अचानक मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने संपूर्ण जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब वाहत आहे. दरम्यान जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील थीलोरी येथे झालेल्या मुसळधार पावसाने शेताच्या रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शेतकरी आपला जीव मुठीत घेऊन घरी परतत असल्याचे पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या पावसाने शेती रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याने दोन बैलगाड्या नदी सदृश पाण्यातून आपली वाट काढत असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान शेतकरी घरी परतण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन बैल गाडीतून घरी परतत असल्याचे दिसून येत आहे.