Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
कृषी लोकप्रिय बातम्या

कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

संभाजीनगर/प्रतिनिधी – टॉमेटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हस्ता गावातील नऊ शेतकऱ्यांनी यंदा स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांने दहा हजार स्क्वेअर फुट म्हणजे दहा गुंठे जागेवर या प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग केला आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांनी हा प्रयोग करण्याचे ठरवले.

त्यासाठी जिल्हा परिषदेने ७५% टक्के सबसिडी दिली असून उरलेला वाटा शेतकऱ्यांनी भरला आहे. पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला असून, यामुळे वार्षिक उत्पन्नात दीड ते दोन लाखांची वाढ झाल्याची माहिती प्रयोगशील शेतकऱ्यांनी दिली आहे. सध्या स्थानिक बाजार पेठांमधे उत्पादित स्ट्रॉबेरी विक्री होत असून हळूहळू कन्नड स्ट्रॉबेरीची मागणी वाढत आहे. टोमॅटो उत्पादनात अनेक वेळा नुकसान सोसावे लागले,मात्र स्ट्रॉबेरी मुळे फायदा मिळत आहे. यानंतर शेतकऱ्यांना रोप आणण्यासाठी महाबळेश्वर किंवा इतर ठिकाणी न जाता आता रोपवाटिकाच आपण तयार करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X