नेशन न्यूज मराठी टीम.
नशिक / प्रतिनिधी – एकीकडे पावसाने दडी मारली असून दुसरीकडे आता सोयाबीन, मका नंतर येवला तालुक्यात आता कपाशी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. येवला तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली.
सोयाबीन, मका पिकानंतर आता येवला तालुक्यातील नगरसुल गावातील अनेक शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर काळा व पिवळा मावा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने अक्षरशः महागडी औषध फवारणी करून देखील, हा मावा जात नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. असून मेटाकुटीला आला आहे. एक तर पाऊस नाही, त्यात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने ,आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.तरी सरकारने हि परिस्थिती गांभीर्याने घेवून, शेतकऱ्यांना ह्या संकटकाळात मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे.