नेशन न्यूज मराठी टिम.
नाशिक/प्रतिनिधी– येवला तालुक्यातील विखरणी येथील शेतकऱ्यांनी मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचनामे करून भरपाई न मिळाल्याने 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
तालुक्यातील पश्चिम भागात तीन वेळेस अतिवृष्टी झाली होती. त्यावेळेस येथील 600 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. संबंधित अधिकारी ग्रामसेवक कृषी अधिकारी आणि तलाठी यांनी पंचनामे केले. पंचनामे करूनही येथील शेतकऱ्यांच्या पदरात एकही रुपया न मिळाल्याने व ठराविक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने येथील संतप्त शेतकऱ्यांनी 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले आहे.