नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जळगाव/प्रतिनिधी – गावाकडे गेल्यावर तुम्ही बाजरीची भाकरी आणि ठेचा खल्ला नाही असं कधी झालं नसेल. आहाराच्या दृष्टीने महत्वाची असणाऱ्या बाजरीचा उपयोग भाकरी, नुडल्स, आंबील, लाह्या व इडली या विविध स्वरुपात केला जातो. शक्यतो बाजरीची लागवड शेतकरी उन्हाळ्यातच करतात. कारण उन्हाळ्यात योग्य असे हवामान आणि पुरक प्रमाणात पानी मिळाल्यामुळे बाजरीची लागवड चांगली होते. पण बाजरीची काढणी जवळ येई पर्यंत शेतकऱ्याला डोळ्यात तेल घालून आपल्या बाजरीची काळजी घ्यावी लागते. कारण बाजरीला दाणे यायला सुरुवात झाली कि ती राणातल्या पाखरांचे अन्न बनते.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये पावसाळी बाजरीनंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीची लागवड केली आहे. शेतात मुबलक प्रमाणात पाणी असल्याने उन्हाळी बाजरीचे उत्पन्न चांगले येते. त्यामुळे शेतकऱ्याने उन्हाळी बाजरीची लागवड केली आहे. यावर्षी हवामान बदल त्याचबरोबर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे बाजरीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाळी बाजरी काढणीला सुरूवात झाली आहे. बाजरी काढणीनंतर मशीनच्या साहाय्याने मळणी सुरु आहे. बाजरीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्याने लागवडीसाठी लागलेला खर्च तरी निघतो की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. बाजारपेठेमध्ये बाजरीला समाधानकारक भाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.