Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

डोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाक

डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली एमआयडीसी परिसरात अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण डोंबिवली (Dombivali) हादरली. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला. 65 हून अधिक लोकं जखमी झाले, तर 9 कामगार अद्यापही बेपत्ता आहेत. एनडीआरएफ, अग्निशमन विभाग यांच्या शोध कार्यात या कंपनीत व परिसरात वीस ते बावीस मानवी अवशेष सापडले. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मयत बेपत्ता असलेल्या कामगारांच्या नातेवाईकांची डीएनए टेस्ट करून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे बेपत्ता असलेले कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आजही कंपनीच्या परिसरात येऊन शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमुदान कंपनीत काम करणारे भारत जयस्वार हे देखील या स्फोटात बेपत्ता आहेत. शोधकार्याच्या दरम्यान भारत जयस्वार यांचे पॅन कार्ड सापडले. मात्र भारत यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही. भारत यांचे पत्नी लहान मुले त्यांचे काका दर दिवस व कंपनीच्या परिसरात येतात आणि त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. स्फोट (Explosion) झाला त्या दिवशी भारत जयस्वार नेहमीप्रमाणे अनुदान कंपनीत कामावर आले. चार ते पाच महिन्यापासून पूर्वीच त्या कंपनीत हेल्पर म्हणून कामाला लागले होते. दुपारी जेवणाच्या सुट्टीत पत्नी हेमा जयस्वार तिच्याशी बोलणं झालं. कॉल करून तू जेवली का? मुलगा जेवला का?अशी विचारपूस केली. भारत यांना गुरुवारचा उपवास होता त्यामुळे भारत जेवण नाकारता पत्नीची आणि मुलाची विचारपूस करून पुन्हा कामाला लागले. त्यानंतर काही वेळात मोठा स्फोट झाला. हेमाला माहिती मिळताच भारत यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांना, ओळखीच्या व्यक्तींना फोन करून चौकशी केली असता काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी सरळ घटनास्थळ गाठले. आज घटनेला आठवडा उलटून गेला. तरी पती भारतचा शोध लागला नाही. गेल्या आठ दिवसांपासून जयस्वार यांची पत्नी हेमा यांनी रुग्णालयात शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशनला अनेकदा चौकशी केली. मात्र अद्यापही भारत यांचा शोध न लागल्याने त्या हतबल झाल्या आहेत. आम्ही कुटुंबाचा आधार गमावलाय, माझ्या पतीचा शोध घ्यावा आणि सरकारने माझ्या मुलांना शिक्षणासाठी मदत करावी अशी मागणी हेमा जयस्वार करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X