नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – पैशाची भूक ही माणसाला कोणत्याही थराला जाण्यास भाग पाडते. कमी वेळेत जास्त पैसे मिळविण्यासाठी सुशिक्षित तरूनही गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळता आहेत. आर्थिक तंगी, बेरोजगारी यामुळे चुकीच्या मार्गाला जाऊन अनेकांनी आपले आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. नवी मुंबईतल्या एका तरुणाने पैसे मिळविण्यासाठी जे केले ते ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
नवी मुंबईतील तळोजा परिसरातील एका अल्पवयीन तरुणाने थेट बनावट नोटांचा छापखाना टाकल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या घरी मध्यरात्री धाड टाकत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याजवळ घरात एकूण 2 लाख किंमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यूट्यूब वरुण माहिती घेऊन आरोपी प्रफुल्ल गोविंद पाटील याने नोटांची छपाई केली. आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे प्रफुल्ल पाटील कुटुंबापासून विभक्त राहत होता. त्याला पैशांची गरज होती पण तो पैसा मिळविण्यासाठी त्याने वेगळ्या मार्गाचा अवलंब केला. त्याने सरळ नोटा छापण्याची मशीन तयार करून नोटांची छपाई केली. प्रफुल्ल पाटीलने छपाई केलेल्या काही नोटा वापरल्या. प्रफुल्ल ने दिलेल्या नोटांचा दुकानदाराला संशय आल्याने त्या दुकानदाराने पोलिसांना याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कडक कारवाई करत बनावट नोटांचा छापखाना उधळून टाकला आणि आरोपी प्रफुल्ल पाटील याला बेड्या ठोकल्या. ही माहिती नवी मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अजय लांडगे यांनी दिली आहे.