नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने(MORTH) एक अधिसूचना(GSR 663(E)) जारी केली आहे. ज्यानुसार केंद्रीय मोटर वाहन नियम 1989(CMVR 1989) नुसार नोंदणी झालेल्या मालवाहतूक वाहनांची स्वयंचलित चाचणी केंद्रांद्वारे अनिवार्य चाचणी करण्यासाठीच्या तारखेला या अधिसूचनेनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे.
आता या अनिवार्य चाचणीसाठी 1 ऑक्टोबर 2024 ही तारीख अधिसूचित करण्यात आली आहे. संबंधित वाहनांची तंदुरुस्ती चाचणी ही केवळ स्वयंचलित चाचणी केंद्रांवरच ( ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून) करून घ्यावी जी स्वयंचलित चाचणी स्थानके नोंदणी प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात नियम 175 अंतर्गत परिचालित आहेत, असे देखील अनिवार्य करण्यात आले आहे.
यापूर्वी [GSR notification 272(E)] द्वारे 5 एप्रिल 2022 रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या तारखा पुढील प्रमाणे होत्याः
1) अवजड मालवाहतूक वाहने/ अवजड प्रवासी वाहने यांच्यासाठी 1 एप्रिल 2023 पासून पुढे
2) मध्यम मालवाहतूक वाहने/ मध्यम प्रवासी वाहने आणि हलकी मोटार वाहने( ट्रान्स्पोर्ट) यांच्यासाठी 1 जून 2024 पासून पुढे.
राजपत्रित अधिसूचना पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. (https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2023/sep/doc2023921254401.pdf)