महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राबविण्यासाठी सेवा पुरवठादारास मुदतवाढ

मुंबई /प्रतिनिधी – महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना राज्यात राबविण्यासाठी सेवा पुरवठादाराबरोबर केलेल्या करारास मुदतवाढ देण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

समितीच्या शिफारशीनुसार तसेच मा. राज्यपाल महोदयांनी दिलेल्या मान्यतेनुसार पुढील 5 वर्षाकरीता म्हणजेच दि.01.02.2019 ते दि.31.01.2024 पर्यत या कालावधीकरीता जुन्या सेवापुरवठादारास मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर सेवापुरवठादारास सन 2018-19 च्या दरसूचीनुसार ALS रुग्णवाहिकेकरीता रु.2,52,146/- दरमहा दर व BLS रुग्णवाहिकेकरीता रु.2,35,166/- च्या दरामध्ये दरवर्षी 8 टक्के दराने दि.31.01.2024 पर्यंत दरवाढ देण्यात येत आहे.

सदर मुदत संपण्यापूर्वी दि.01 फेब्रुवारी,2024 पासून पुढील कालावधीकरीता नवीन सेवा पुरवठादार निवडीबाबतची ई-निविदा प्रक्रिया दिनांक 31 जानेवारी, 2024 पूर्वी पूर्ण करुन नवीन सेवापुरवठादाराची निवड करण्यात येईल.

त्याचप्रमाणे सदर सेवापुरवठादारास दि.01.02.2019 ते 31.01.2024 या कालावधीकरीता समितीच्या शिफारशीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्तीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार विभागास राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×