नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ ( (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये शाळांनी निश्चित केलेल्या प्रवेशस्तर वर्गात बालकांसाठी 25% प्रवेश राखीव ठेवण्यात आलेले आहेत. सन 2023 2024 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत असून प्रथम फेरीमध्ये निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश प्रक्रीयेची सुरुवात दिनांक 13/04/2023 पासून सुरु झालेली असून पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वर बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश निश्चितीसाठी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणेसाठी शासनाने दिनांक 08/05/2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार के. शंकरराव झुंझारराव मनपा शाळा क्रमांक गांधीचोक बारदान गल्ली, कल्याण पश्चिम या पडताळणी केंद्रामध्ये पडताळणी समितीकडून दिनांक 08/05/2023 पर्यंत (कार्यालयीन व शासकीय सुटीचे दिवस वगळून) सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत मुदतीत कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या RTE PORTAL वर अॅलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी. सदर अॅलोटमेंट लेटर व प्रवेश प्रक्रीयेकरिता आवश्यक कागदपत्रे मुळ प्रतींसह छायांकित प्रतींचा दोन संच घेऊन पडताळणी केंद्रावर उपस्थित राहून पडताळणी समितीकडून दिनांक 08/05/2023 पर्यंत (कार्यालयीन व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) मुदतीत कागदपत्रांची तपासणी करुन आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करावा.असे आवाहन शिक्षण विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्र. प्रशासन अधिकारी व्ही. व्ही. सरकटे यांच्या कडून करण्यात येत आहे.