महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image अर्थसत्ता लोकप्रिय बातम्या

पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – करदात्यांना पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठीची आणखी काही वेळ देण्यात आली आहे. पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्यासाठी 30 जून, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, ज्याद्वारे करदाते परिणामांना सामोरे न जाता आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करण्यासाठी विहित प्राधिकरणाला त्यांचे आधारकार्ड सूचित करू शकतात. याबाबतची अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत आहे.

प्राप्तिकर कायदा, 1961 (‘कायदा’) च्या तरतुदींनुसार 1 जुलै, 2017 रोजी पॅनकार्ड वाटप करण्यात आलेल्या आणि आधारकार्ड क्रमांक मिळवण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने विहित प्राधिकरणाला त्याचे आधारकार्ड सूचित करणे आवश्यक आहे. किंवा 31 मार्च 2023 पूर्वी, विहित शुल्क भरून ते लिंक करणं गरजेचं आहे. असं करण्यात अयशस्वी झालेल्यांना  कायद्यानुसार 1 एप्रिल, 2023 पासून त्याचे परिणाम भोगावे लागतील. मात्र आता. पॅन आणि आधार लिंक करण्याच्या उद्देशाने विहित प्राधिकरणाला आधारकार्डची माहिती देण्याची तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

1 जुलै, 2023 पासून, आवश्यकतेनुसार, आधारकार्ड सूचित करण्यात अयशस्वी झालेल्या करदात्यांचं पॅनकार्ड निष्क्रिय होईल आणि पॅनकार्ड निष्क्रिय राहण्याच्या कालावधीत त्याचे परिणाम खालीलप्रमाणे असतील:

  1. अशा पॅनसाठी कोणताही परतावा दिला जाणार नाही;
  2. ज्या कालावधीत पॅन निष्क्रिय राहते त्या कालावधीसाठी अशा परताव्यावर व्याज देय होणार नाही; आणि
  3. TDS आणि TCS जास्त दराने कापले जातील/संकलित केले जातील, कायद्यात प्रदान केल्याप्रमाणे.

1,000 रुपये शुल्क भरल्यानंतर विहित प्राधिकरणाला आधारकार्डची माहिती दिल्यानंतर 30 दिवसांत पॅनकार्ड पुन्हा सुरू करता येईल.

ज्या व्यक्तींना पॅन-आधार जोडणीमधून सूट देण्यात आली आहे त्यांना वर नमूद केलेले परिणाम लागू होणार नाहीत. या श्रेणीमध्ये विशिष्ट निर्देशित राज्यांमध्ये राहणारे, कायद्यानुसार अनिवासी, भारताचे नागरिक नसलेली व्यक्ती किंवा मागील वर्षात कोणत्याही वेळी ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश होतो.

आतापर्यंत 51 कोटींहून अधिक पॅनकार्ड आधारकार्डशी जोडले गेले आहेत. https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar खालील लिंकवर प्रवेश करून पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×