नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने थकीत कर वसूलीच्या दृष्टीकोनातून 75 % व्याजमाफीची अभय योजना-2023 लागु करण्यात आली असून संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराच्या मागणीची संपूर्ण रक्कम अधिक शास्ती (दंड/व्याज) ची रक्कम 25% रक्कम एकरकमी भरल्यास 75% शास्ती (दंड / व्याज) माफ केले जात आहे. या योजनेचा कालावधी दि.15 जून 2023 ते दि. 18 ऑगस्ट 2023 असा होता. या कालावधीत एकुण 40751 थकीत करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून एकूण 175 कोटी रुपये वसूल झाले आहेत.
थकीत करदात्यांनी या योजनेस दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल थकीत करदात्यांचे प्रशासनाकडून आभार व्यक्त करण्यात असून अभय योजना 2023 मुदत दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढविण्यात येत आहे. तसेच चालू वर्षाची कराची संपूर्ण रक्कम एकरकमी जमा करणा-यांना देण्यात येणा-या 5% सुटीची मुदत दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. तरी सर्व मालमत्ता करदात्यांनी याचा लाभ घ्यावा व महापालिकेस सहाकार्य करून विकासाला हातभार लावावा असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले असल्याची माहिती प्र. उप आयुक्त (कर) विनय कुळकर्णी यांनी दिली.