महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी

डोंबिवलीच्या एमआयडीसीत स्फोटांचं सत्र सुरूच…

प्रतिनिधी.

डोंबिवली – एमआयडीसीतील स्फोटांचं सत्र अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आज डोंबिवली एमआयडीसीतल्या अंबर केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मध्ये अंबर कंपनी आहे. या कंपनीत आज संध्याकाळी सव्वापाचच्या दरम्यान मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की आजूबाजूचा संपूर्ण परुसर हादरून गेला. या स्फोटामुळे अंबर कंपनीसह आजूबाजूच्या दोन कंपन्यांचंही मोठं नुकसान झालं. सुदैवाने आज या कंपनीला सुट्टी असल्यामुळे कुणालाही इजा झालेली नाही. या स्फोटाचा हादरा आणि त्यानंतर पसरलेल्या केमिकलच्या वासामुळे या भागातल्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. आजूबाजूचे लोक घाबरून घराबाहेर आले. याच कंपनीच्या बाजूला असलेला रस्ता काही महिन्यांपूर्वी प्रदूषणामुळे गुलाबी झाला होता. तर याच परिसरातल्या मेट्रोपोलिटन कंपनीलाही फेब्रुवारी महिन्यात भीषण आग लागली होती. यानंतर आज पुन्हा झालेल्या स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतल्या या जीवघेण्या केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Translate »
×