प्रतिनिधी.
कल्याण – ठाकुर्ली मार्गावर असणाऱ्या कचोरे गावातील टेकडीवर असणाऱ्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी संपूर्ण घराचे आणि शेजारील घराचे नुकसान झाले आहे.
तर हा स्फोट होण्याच्या अवघ्या काही सेकंदांपूर्वी शेजारील घरातील।एक तरुण बाहेर पडल्याने तो या दुर्घटनेतून सुखरूप बचावला. घरामध्ये ही आग नेमकी कशामुळे।लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Related Posts