नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – पोलिस जागृत असून सुद्धा दिवसेंदिवस महाराष्ट्रात गुन्हेगारीत वाढ होत आहे. बॅगेत तसेच बेवारस मृतदेह आढळल्याच्या कित्येक घटना गेल्या वर्षभरापासून समोर येत आहेत. अशीच एक घटना डोंबिवलीत घडली आहे.
डोंबिवलीतून हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली रेल्वे रेलवे स्टेशन जवळील, बावन्न चाळीच्या परिसरात एका महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळला आहे. पोलिसांनी रात्रीच्या सुमारास महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच त्यांनी मृतदेह आढळलेल्या परिसराची पाहणी केली आणि महिलेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांच्या मते महिलेचे वय साधारण ५० वर्षे असण्याची शक्यता आहे.
महिला कोण आहे? तिचा मृत्यू कसा झाला? हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा तपास डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस करीत आहेत. लवकरच महिलेच्या मृतदेहाची ओळख पटेल. तसेच आरोपी चा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.