डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे :- राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंम्बर च्या पार्श्वभूमीवर गावठी दारू निर्मिती विरोधात धडक मोहिमेला सुरुवात केली आहे .राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाने गत बारा दिवसात धडक कारवाई करीत देसाई व आगासन खाडीत सुरू असलेल्या आठ गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्वस्थ केल्या . या कारवाईत गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे ३५ हजार लिटर रसायन व १४० लिटर गावठी दारू व दारू बनण्याचे साहित्य असा सुमारे पावणे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आल्याची माहिती डोंबिवली विभागीय कार्यालयाचे वरीष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी दिली .
थर्टी फर्स्ट डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या दारूला मोठी मागणी असते .या मध्ये देशी विदेशी बरोबरच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी गावठी दारूची ही मागणी मोठया प्रमाणात आल्याने या कालावधीत चोरी छुपे पणे गावठी दारूची निर्मिती केली जात असते त्यातून काही वर्षा पूर्वी विषारी गावठी दारू पिऊन शेकडो मद्यापीना आपला जीव गमवावा लागला असल्याने गावठी दारूचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गावठी दारू निर्मितीवर पायबंद घालण्यासाठी राज्या उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे .
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप ,विभागीय आयुक्त सुनील चव्हाण व ठाणे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार दुय्यम निरीक्षक विश्वजित आभाळे,दुय्यम निरीक्षक मल्हारी होळे, जवान देवकाते, महाजन ,प्रीती पाटील,अमृता नगरकर आदी स्टाफ जीवाची भीती न बाळगता खाडीत उतरून मारलेल्या धाडीत सहभागी झाले होते.
त्याच बरोबर राज्य उत्पादन शुल्क विभाग डोंबिवली कार्यालयाचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे कि जर तुम्हाला दमन दारू, गोवा दारू किवा गावठी दारूची निर्मिती किवा विक्रीची माहिती असेल तर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग डोंबिवली कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी. यामुळे विषारी दारू पासून बळी जाणाऱ्या नागरिकांचे आपण प्राण वाचवू शकतो.