महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image आरोग्य लोकप्रिय बातम्या

डिजिटल साधनाचा अति वापर डोळ्यांच्या आजाराला निमंत्रण,वेळीच उपचार घेण्याचा नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांचा सल्ला

डोंबिवली/प्रतिनिधी– कोरोनाच्या संकटा मुळे राज्य सरकारने जून २०२० पासून ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर दिला. एकीकडे विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सरकारने डिजीटल पद्धतीचा अवलंब स्विकारला. या शिक्षणासाठी मोबाईल आणि संगणकचा वापर वाढला असल्याने डोळ्यांचे आजार वाढत आहेत. लहान मुलांमधील डोळ्याचे आजार वाढू नये यासाठी वेळीच उपचार घ्यावे  असा सल्ला प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ.अनघा हेरूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांनी यावेळी डोळ्यासंबंधी आजारांवर आणि म्युकर मायकोसीसवर माहिती दिली. त्या म्हणाल्या, सध्या कोविड काळात सर्वच परिस्थिती बदलली आहे. कोविड नियंत्रणात यावा म्हणून शासन-प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन वर्क-फॉम्-होम व ऑनलाईन शिक्षण सुरू केले. परंतु याचा परिणाम म्हणून डोळ्यांच्या आजारात वाढ झाली आहे. सध्या म्युकर मायकोसीस हा रोग जोर धरत असून त्यावर नियंत्रण मिळावे याकरता डोळ्यांची तपासणी तात्काळ करून घेणे हिताचे आहे असे त्यांनी सांगितले.आजकाल काम आणि खेळ दोन्हीसाठी एकच तंत्रज्ञान वापरलं जातं. खेळ असो वा काम समोर एक स्क्रीन असतेच. मग ती मोबाईलची असो, कॉम्प्युटरची किंवा लॅपटॉप, टॅबलेट ची. या स्क्रीन वर खूप काळ सातत्याने बघत राहिल्याने डोळ्यांचे विकार बळावतात. स्क्रीनवर एकटक बघत राहिल्याने डोळ्यांची उघडझाप कमी होवून डोळ्यांवर ताण  निर्माण होतो. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा, ताण येणे, डोळे जडावणे, डोकेदुखी असे त्रास होतात. जर ही सवय सोडली नाही तर आपल्याला अनेक त्रासांला सामोरे जावे लागेल. जर डिजिटल साधने वापरायची असतील तर कमीत कमी एक तासामध्ये तीन वेळा २०  सेकंदाच्या ब्रेक घेणे आवश्यक आहे. याबरोबर बैठे काम करतांना बसण्याच्या पध्दतीवर लक्ष ठेवले पाहिजे. सध्या लाइफस्टाइल बदलल्याने कमी वयातही मोतीबिंदूचे रुग्ण दिसून येतात. म्युकर मायकोसीस प्रकारात प्रथम नाकावाटे विषाणूचा शिरकाव होतो त्यामुळे वेळीच जागरूक राहिले पाहिजे. नाक, डोळे आणि मेंदुवर याचा परिणाम होतो. डोळे सुजणे, नाकातून घाण वास येणे, डोळ्यांची बाजू दुखणे, डोळा पुढे येणे अशी लक्षणे दिसून येतात यासाठी जनजागृती करणे खुप महत्वाचे असून यासाठी आमची तयारी आहे. यासाठी आमच्याकडून शाळांना तसेच शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार केला गेला पण त्याकडे दुर्लक्ष झाले याचे आश्चर्य वाटते असेही त्यांनी सांगितले.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारावर वाढ झाली आहे.असे आजर होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी व उपाययोजना यावर माहिती देण्यासाठी नेत्रतज्ज्ञ डॉ.अनघा हेरूर यांनी डोंबिवलीतील शाळांना संपर्क केला होता. लहान मुले आणि पालवर्गासाठी आठवड्यातून एकदा माहितीपर ऑनलाईन जनजागृती करू या. यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारणार नाही असे डॉ.हेरूर यांनी शाळा व्यवस्थापनांना सांगितले होते. मात्र एकही शाळेने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला नाही अशी खंत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »