नेशन न्यूज मराठी टीम.
जालना/प्रतिनिधी – पूर्वी पासूनच संपूर्ण महाराष्ट्र सर्वच हे गुण्या गोविंदाने साजरे केले जातात. त्यात आता नवीन युगा प्रमाणे सण साजरे होताना दिसत आहे. सणांचे स्वरूप बदललेले दिसत आहे ,आधुनिक पद्धतीने सन साजरे करताना त्यातील गोडवा आपण विसरत चाललो आहे का? असा प्रश्न सर्वांना पडताना दिसत आहे. सणाच्या नावाखाली डीजे असो किवा कोणतेही वाद्य त्याचा अतिरेक होताना दिसत आहे.त्याच बरोबर सणाच्या नावाखाली ध्वनी प्रदूषणाला आपण मोठ्या प्रमाणात वाव देत आहोत, असे चित्र आता बघायला मिळत आहेत.
पण या आवाजाच्या खेळात आपल्या पायी कुणाला तरी जीव गमवावा लागतो, कुणाला बहिरे पणा येतो किवा कुणाचे काही नुकसान होत आहे का ? याचा विचार आपण करताना दिसत नाही.डीजेच्या व इतर वाद्यांच्या आवाजाला काही मर्यादा दिल्या आहेत आपण त्यांचे पालन करताना कोणी दिसत नाही. आपला सण गोड होताना निष्पाप लोकांचा बळी जाने हे कितपत योग्य आहे . त्याचा सर्वानीच विचार करण्याची वेळ आली आहे.
कर्ण कर्कश आवाजाने हृदय विकाराने बळी जाण्याच्या घटनेत वाढ होतानाचे चित्र दिसत आहेत. याच आवाजामुळे ऐकण्याची क्षमता कमी होताना दिसत आहे.आताच संपूर्ण देशात ठिकठिकाणी गणेश उत्सव मोठ्या आनंदी वातावरणात साजरा झाला आहे, पणआवज काही मोठ्या मंडळानी मिरवणुकीत डीजेच्या आवाजाजी मर्यादा ओलांडली असल्याचे दिसून आले आहे. जालना शहरातील एका गणपती मंडळावर अति मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानाचा गणपती मंडळ यांना पोलिसांनी वेळोवेळी माहिती दिली होती की जे डिसेबल पातळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली त्याचे पालन करा पण त्यांनी उल्लंघन करत मोठ्या 107 डिसेबल आवाजात डीजे वाजवण्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे.
यामध्ये सुमारे 42 जणांवर विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहे.