नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – विक्रोळी चे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानिमित्ताने विक्रोळी मधील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार सुनील राऊत यांनी उपेंद्र सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनील राऊत यांच्या म्हणण्यानुसार, दहा दिवसांपूर्वी उपेंद्र सावंत हे माझ्याकडे आले होते त्यांनी सांगितलं की, मला पंधरा कोटींचा बाँड आणि पाच कोटी कॅश ची ऑफर आली आहे परंतु मी पक्ष सोडून जाणार नाही आणि त्यांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्याने त्याची निष्ठा विकली.
उपेंद्र सावंत यांनी आम्हाला कोणत्या गोष्टी शिकवू नये. त्याला एका बलात्काराच्या प्रकरणातून मी वाचविले होतं. माझ्याकडे अजूनही त्याचे व्हिडिओ आहेत.
उपेंद्र सावंत हे जरी शिंदे गटात गेले असले तरी कन्नमवार नगर मधील एक ही कार्यकर्ता त्यांच्यासोबत गेलेला नाही. विक्रोळीतील प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे आणि शेवटपर्यंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते गेल्याने भाजपमध्ये असंतोष आहे. उद्या भाजपमध्ये देखील तेच होणार आहे. निष्ठावंत गट बंडखोरी करणार.
मला देखील दिल्लीतून शंभर कोटींची ऑफर होती पण आम्ही आमची निष्ठा विकली नाही असा खुलासा सुनील राऊत यांनी केला आहे. आयुष्यात गद्दार म्हणून बोलणं हे माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकाला मान्य नव्हतं. मी आज उद्या आणि कायम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे ते म्हणाले.