महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image आरोग्य लोकप्रिय बातम्या

डेल्टा प्लसचे रुग्ण जरी वाढले तरी चिंता करण्याची गरज नसली तरी नियमाचे पालन करणे गरजेचे- आरोग्य मंत्री टोपे

बुलडाणा/प्रतिनिधी – राज्यात काल पुन्हा डेल्टा प्लस चे 10 रुग्ण आढळले असून राज्यात एकुण रुग्णाची संख्या आता 76 झाली आहे, तरी सुद्धा चिंता करण्याची काहीही गरज नाही असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.ते बुलडाण्याच्या खांमगावात पत्रकारांशी बोलत होते. आरोग्यमंत्री टोपे हे खांमगावच्या सिल्वर सिटी रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या एमआरआय आणि सिटीस्कॅन चे उद्घाटनसाठी सोमवारी 16 ऑगस्ट रोजी खांमगावात आले होते.यावेळी काँग्रेसचे माजी दिलीपकुमार सानंदा यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. जे डेल्टा प्ल रुग्ण आढळले त्यांची आणि संपर्कातील लोकांची तपासणी करत आहेत.आरोग्य विभागाकडून दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यात 100 नागरिकांची तपासणी होत आहे,आणि जे बाधित आढळत आहे त्यांचा उपचार करण्यात येत आहे. कोरोनाचे आणि डेल्टा पल्सच्या सीमटन्स आणि उपचारांमध्ये फार काही फरक नाही.त्यामुळे काळजी करण्याचे विषय नसला तरी आपण लक्ष ठेवले पाहिजे. जर तिसरी लाट थांबवायची असेल तर नियमाचे पालन करावें, जरी निर्बंध शिथिल केले असले तरी.नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी राजेश टोपेंनी राज्यातील जनतेला केले. महाराष्ट्राने एका दिवशीत 9 लाख 36 हजार लसीकरण करण्याचा विक्रम केलेला आहे.केंद्राने जर आपल्याला लसी जर मोठ्या प्रमाणात पुरवल्या तर दररोज आपण 15 लाखपर्यत लसीकरण करण्याची तयारी आहे असेही ते यावेळी टोपे यांनी संगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×