नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
परभणी/प्रतिनिधी -सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येक पक्षाने निवडणुकीसाठी आपली जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्याच प्रमाणे पक्ष प्रवेश होताना दिसत आहे. त्यातच स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांना भाजप कडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली जात असल्याच्या मुद्द्यावर राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला थेट नाही, मात्र मध्यस्थांकडून मी केंद्रीय मंत्र्यांना भेटावं, त्यांच्याकडून काम करून घ्यावीत, त्यांच्याशी जवळीक साधावी, अशा प्रकारचे निरोप मला येत आहेत. परंतु कितीही मोठी ऑफर आली, तरी हुरळून जाणारा कार्यकर्ता मी नाही. आमच्या कार्यकारिणीने निर्णय घेतलेला आहे. आम्ही ना भाजप सोबत जाणार, ना महाविकास आघाडी सोबत. त्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.