महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

पावसाच्या विश्रांती नंतरही भिवंडीतील खड्डे जैसे थे

भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीतील रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्ते व उड्डाणपुलांवरील रस्त्यांवर देखील प्रचंड खड्डे पडल्याने नागरिकांसह वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांकडे भिवंडी मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मनपा प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.              

तर रस्त्यांवर पडलेले खड्डे पावसामुळे भरण्यास मनपा प्रशासनास अडचण येत असून पावसाने उसंत दिल्यास शहरातील खड्डे तत्काळ भरण्यात येतील असा कांगावा भिवंडी मनपा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र मागील चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असतांनाही शहरातील रस्त्यांवर खड्डे जैसे थे असेच आहेत. त्यामुळे खड्डे तत्काळ भरण्याचा मनपा प्रशासनाचा दावा सध्यातरी फोल ठरला असल्याचे चित्र शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पाहावयास मिळत आहे. सोमवारी शासकीय निर्देशाने शाळा सुरु झाल्याअसल्याने चाकरमान्यांसह शाळेतील विद्यार्थ्यांना देखील या खड्डेमय रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या खड्डेमय रस्त्यांवरून धूळ उडत असल्याने खड्ड्यांबरोबरच रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने नागरिकांसह प्रवाशी हैराण झाले आहेत. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »