महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

पंढरपूरात यात्रा कालावधीत १४ आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

पंढरपूर/अशोक कांबळे – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आषाढी यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार शासनाने परवानगी दिलेल्या 10 मानाच्या पालख्यांना पंढरपूरात प्रवेश देण्यात येणार. या पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात तसेच आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतही अडचण येऊ नये यासाठी पंढरपूरात 14 आपत्ती व्यवस्थान कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच आरोग्य व्यवस्थापनासाठी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर तसेच स्वच्छतेसाठी नगरपरिषद पंढरपूर येथे आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. वाखरी तळ, विसावा मंदीर, चंद्रभागा नदी वाळवंट, तुकाराम भवन, मंदीर परिसर, शासकीय विश्रामगृह, गोपाळपूर तसेच सांस्कृतीक भवन, प्रांत कार्यालय येथे मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे श्री. ढोले यांनी सांगितले.

वाखरी पालखी तळाचे बॅरेकेटींग, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, स्वछता गृहे, आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय व्यवस्था, वॉटर प्रुफ मंडप आदी व्यवस्था पालखी तळावर करण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी यात्रा कालावधीत आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी फिरते आरोग्य तपासणी पथक, मुबलक औषधसाठा, रक्तसाठा , सुसज्ज रुग्णवाहिका, तज्ञ डॉक्टरांचे पथक नेमले जाणार आहे. मंदीर व मंदीर परिसर, नदी पात्र, घाट, प्रदक्षिणा, मार्ग, या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता राखली जाणार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला निर्णय नागरिकांच्या व भाविकांच्या हिताचा असून निर्णयाचा मान राखून पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »