प्रतिनिधी.
नाशिक – लॉकडाऊनमुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरातील अनेकांच्या रोजगारावर गदा आली आणि ते सारे मुंबईतून पायीच आपल्या गावाकडे निघाले. रस्त्यांना त्यांना अनेक सेवाभावी संस्थांनी पॅकिंग अन्न दिले, प्लास्टिक बाटलीतून पाणी दिले. हा सारा कचरा मुंबई-आग्राच्या अवतीभवती तसाच पडलेला असल्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून नाशिकचे एक निसर्गप्रेमी वाहतूक पोलीस सचिन जाधव यांनी टाकाऊतून टिकावू हे सूत्र अवलंबून या बाटल्यांमध्ये औषधी, वनस्पती, फुलझाडे फुलविली आहेत. त्यांच्या या उपक्रमातून त्यांनी ‘कोरोना’ काळात रस्त्याची सुरक्षा आणि पर्यावरणाचीही रक्षा केली आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक बागेची हिरवळ आणि दरवळ आता पोलीस स्टेशन, विविध कार्यालयात आणि महामार्गावर दिसणार आहे.
लॉकडाऊनमध्ये मुंबईकडून पायी निघालेल्या परप्रांतियांनी वापरलेल्या खाद्यपदार्थांचे पॅकिंग, प्लास्टिक बाटल्यांचा कचरा सर्वत्र पडलेला पाहून अनेकांना वाईट वाटले. मात्र महामार्गाची स्वच्छता करण्यासाठी कोणी पुढे आले नाही. मात्र याच कालावधीत महामार्गावर कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलीस सचिन जाधव यांना एक कल्पना सूचली आणि त्यांनी स्वयंस्फूर्तीने या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्यात फुलझाडांसह, तुळशी, अडुळसा, अश्वगंधा, कोरफड अशा औषधी वनस्पती लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आता त्यांच्या या पर्यावरणपूरक बागेतील ही फुलझाडे आणि औषधी वनस्पती नाशिकमधील विविध पोलीस चौक्या कार्यालये, महामार्गावर बहरलेल्या दिसणार आहेत. हे कार्य करीत असताना जाधव यांनी महामार्गावरील बॅरिकेड्सवरही पर्यावरण रक्षणाचे, जनजागृतीचे फलकही लावले. तसेच काही बाटल्यांमध्ये पाण्याची सोय केली असून, ते पक्ष्यांसाठी ठेवण्यात आले आहे. अनेक तहानलेले पक्षी या भांड्यातील पाणी पिऊन आपली तहान भागवित आहेत.
पर्यावरणाशी नाते जोडणाऱ्या सचिन जाधव यांनी टाकावूपासून टिकाऊचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या उपक्रमातून कचऱ्याची विल्हेवाट होणार आहेच, शिवाय नाशिक स्मार्ट सिटीलाही मोठा फायदा होणार आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जाधव यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. नाशिकमधील विविध पोलीस चौक्या आणि हद्दीतील महामार्गावर ही रोपे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Related Posts
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशातील लोकशाहीच्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत "जल दिवाळी" उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - शासनाव्दारे DAY-NULM व…
-
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…
-
टाकाऊ प्लास्टिक पासून विद्यार्थ्यांनी साकारले ‘इकोब्रिक्स'
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - प्लास्टिक टाळण्याचा…
-
दिपोत्सवानिमित्त चिमुकल्यांनी साकारले टाकाऊ वस्तूंपासून आकाश कंदील
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जळगाव/प्रतिनिधी - पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा…
-
कोळसा मंत्रालयाचा कोळसा जोडणीचा सुसूत्रीकरण नावाचा धोरणात्मक उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा 'आईज अँड ईअर्स' उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - रेल्वे ट्रॅक ,रेल्वेस्थानक…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या…
-
साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्यांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - कोकण विभागात जमीन, हवा,…
-
पर्यावरणप्रेमी नागरीकांकडून मिरवडी गावात दोन हजार देशी झाडांचे वृक्षारोपण
नेशन न्यूज मराठी टीम. दौंड/ प्रतिनिधी- मिरवडी ग्रामपंचायत च्या स्मशानभूमी…
-
शाळा आपल्या दारी,एकात्मिक आदिवासी प्रकल्प अकोला कार्यालयाचा उपक्रम
प्रतिनिधी. अकोला - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येणाऱ्या…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात "नवभारत साक्षरता अभियान उपक्रम" सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /संघर्ष गांगुर्डे- महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार…
-
मानवी रांगोळीतून मतदार जनजागृतीचा अनोखा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत…
-
वाहतुक नियमांच्या जनजागृतीसाठी कल्याण ट्रॅफिक पोलिसांचा 'नो चलान डे' उपक्रम
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - मोटार वाहन रेग्युलेशन २०१९…
-
वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम, सामाजिक बांधिलकी जपत केले रक्तदान शिबिराचे आयोजन
डोंबिवली/प्रतिनिधी - नमस्कार मित्रांनो कृपया रक्तदान करा आणि माझा वाढदिवस…
-
हर घर तिरंगा" उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना केडीएमसीचे आवाहन
https://youtu.be/NoiXjgxIC2U नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 15 ऑगस्टला…
-
धुळे कारागृहाचा प्रेरणादायी उपक्रम , कैद्यांनी घडविल्या सुंदर गणेश मूर्ती
नेशन न्यूज मराठी टिम. धुळे/प्रतिनिधी - धुळे येथील जिल्हा कारागृहात…
-
आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांकरीता उद्योग शिक्षण, उद्योजक मानसिकतेचा विकास उपक्रम
मुंबई प्रतिनिधी- उद्यम लर्निंग फाउंडेशन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय…
- राज्यातील पहिला अभिनव उपक्रम, फिश-ओ-क्राफ्ट’द्वारे रोजगार निर्मिती
प्रतिनिधी। मुंबई- मत्स्य कातडीपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग…
-
कल्याणात पोलिस व केडीएमसीच्या पुढाकाराने हॅपी स्ट्रीट उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/4UApkHfc-yU कल्याण - कल्याणकरांसाठी आजाशी सकाळ…
-
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’,शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन…
-
वाशीतील सिडको कोव्हिड सेंटरमध्ये अनोखा उपक्रम, कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय
नवी मुंबई/ प्रतिनिधी- कोरोनाबाधितांचा कोव्हिड सेंटरमधील कालावधी तणावरहित जावा व…
-
वृक्षलागवड उपक्रम ही लोकचळवळ व्हावी - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर
प्रतिनिधी. अमरावती - वन आणि विविध विभागांच्या सहाय्याने जिल्ह्यात यंदा…
-
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे, टाकाऊ वस्तूंपासून खेळण्यांची रचना करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - खेळण्यांसाठीच्या राष्ट्रीय कृती…