Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

पर्यावरण दिनानिमित कल्याण डोंबिवली मनपाचा झाडे लावा सेल्फी पाठवा उपक्रम

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – वृक्ष संवर्धनासाठी केडीएमसीने पुढाकार घेतला असून येत्या पर्यावरण दिनाला किमान १ झाड लावा आणि महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवर झळका हा उपक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आयोजित केला आहे.   

वृक्ष लागवडीमुळे आजूबाजूचा परिसर सदाहरित होतो आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बहुमोल मदत होते. त्यामुळेच यावर्षीच्या पर्यावरण दिनानिमित्त महापालिका एक अनोखी संकल्पना राबवित असून ५ जून रोजी “पर्यावरण दिनी” महानगरपालिका क्षेत्रात किमान १ झाड लावून त्यासमवेत स्वत:चा सेल्फी फोटो kdmcsocialmedia2020@gmail.com  या ई-मेल आयडीवर पाठविल्यास सदर फोटो महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवर प्रसिध्द केला जाईल.

महापालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा प्रादुर्भाव पाहता, सध्याच्या काळात ऑक्सिजनचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेता जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नागरिकांच्या सहयोगाची देखील अत्यंत आवश्यकता असून पर्यावरण दिनी म्हणजेच ५ जून रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेल्या झाडे लावा आणि आपला सेल्फी पाठवा या नवीन संकल्पने साठी जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X