महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पर्यावरण लोकप्रिय बातम्या

‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, अधिकाऱ्यांचा पर्यावरण दिनी सन्मान

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘माझी वसुंधरा अभियान 2.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान रविवार 5 जून 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

मुंबईतील टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे हा कार्यक्रम आयोजित केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

वातावरणात होत असलेले बदल आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या दाराशी आले आहेत. हे सत्य स्वीकारून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. पर्यावरण रक्षणासाठी भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्वांवर शासन काम करीत असून यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ उपक्रमाद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यावरणाच्या सुधारणेसाठी संभाव्य कृती बिंदू ओळखावे यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. वातावरणीय बदलांचे गांभीर्य लक्षात घेता यावर उपाययोजना करण्याची हीच योग्य वेळ असल्याने शासनस्तरावरून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »