Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
इतर

उद्योजक के.रवि यांच्या कडून गरजू पत्रकारांना अन्नधान्याचे वाटप.

प्रतिनिधी

मुंबई – कोरोना(कोविड-१९) च्या संक्रमणा मुळे गेली दोन ते अडीच महिने संपूर्ण भारतात लॉक डाऊन होत.हातावर पोट असणारे असो वा मध्यमवर्गीय तथा श्रीमंत सर्वच भविष्याला घेऊन चिंतेत होते, मजूर लहान व्यापारी यांची स्थिती अतिशय भयानक आहे. शासन स्तरावर भरपुर प्रयत्न चालू आहेत, पण ही मदत किती काळ मिळणार? व कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे . त्या करीता आपली ही सुद्धा काही जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन चित्रपट, नाट्य क्षेत्रातील संघटना यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या क्षेत्रातील लोकांना मदत केली आहे,ज्या तृतीयपंथीयांचा समाज नेहमीच तिरस्कार करत असतो अशा तृतीयपंथीयांनीही अनेक गरीब,आंधळे पांगळे या लोकांना मदत केली आहे व एक आदर्श निर्माण केला.विविध सामाजिक संस्थांनी स्थलांतर करणारे श्रमिक यांना अन्नदान केले हे आपण बघीतले आहे,हे सगळ घडत असताना आहोरात्र परिश्रम करून आपल्याला ताज्या बातम्या देणारे प्रिंट,आणि टी व्ही  मीडिया मधील तांत्रिक  कर्मचारी,रिपोर्टर,फोटोग्राफर, यूं ट्यूब न्यूज रिपोर्टर्स व इतर सर्व प्रेस कमीअधिक प्रमाणात बंद पडल्यामुळे येथे काम करणारा पत्रकार वर्ग आर्थिक संकटात सापडला.

अशा परीस्थिती मधे जगावं कसं संसार चालवावा कसा मुलांचं शिक्षण संगोपन कस करावं ह्या विचाराने चिंतीत होऊ लागला. हि बाब लक्ष्यात आल्यावर स्वतः पुढाकार घेऊन ज्येष्ठ समाजसेवक , व्यवसायिक के. रवी यांनी क्षमते नुसार महाराष्ट्रातील पत्रकारीता क्षेत्रातील लोकांना अन्न धान्य व थकलेले घरभाडे व अन्य खर्च म्हणून रोख रक्कम देऊन मदत केली. सर्व पत्रकार बंधूनी के रवी याचे खूप खूप आभार मानले आहे. के रवी नेहमीच म्हणतात जिथे कमी तिथे आम्ही .तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गाने के.रवि लोकांची मदत करत असतात.लॉकडाऊन काळातही त्यांनी सर्व गरजू लोकांना खूप मदत केली. या मध्ये नंदू गमरे , चंद्रन कमलराज , दीपक गमरे ,राहुल रवि , डॉ .रतन पवार, ज्वॉयरोम फर्नांडिस,अतुल चौभे आणि दिनेश सोलंकी यांनी मोलाचे सहकार्य केले .

Translate »
X