नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
पंढरपूर/प्रतिनिधी – जसे पंढरपूरला भूवैकुंठ म्हटले जाते तसेच संतांनी चंद्रभागा नदीचा उल्लेख आपल्या अभंगातुन बहीण असा केला आहे. चंद्रभागा स्नान म्हणजे वारकरी सांप्रदायात पुण्यकर्म समजले जाते. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना मात्र इथे आल्यानंतर चंद्रभागेचे जे बकाल रूप दिसते ते पाहून धक्का बसतो. दरवेळी आषाढी यात्रेपूर्वी आढावा बैठका घेतल्या जातात. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वारकरी प्रतिनिधी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात पडलेले घाणीचे ढिगारे, नदीच्या पाण्यास येत असेलली दुर्गंधी आणि कचऱ्याचे साम्राज्य या बाबत तक्रार करतात. वारी पूर्वी दोन चार दिवस स्वछता केली जाते, पुन्हा परिस्थिती जैसे थे तशीच राहते. प्रशासनाच्या या उदासीनतेवर येणाऱ्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आपण आता चंद्रभागेच्या वाळवंटात आलो आहोत आणि चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि नदीचे पात्र याची बकाल अवस्था पाहून नक्कीच कुठल्याही भाविकाला,पंढरपूरकराला वेदना झाल्याशिवाय राहणार नाही.नमामी चंद्रभागा या योजनेचा गवगवा येथील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केला गेला मात्र त्याची अमंलबजावणी मात्र होताना दिसून येत नाही.
आज उजनीतून पाणी सोडले आहे. चार दिवसांनी हे पाणी पंढरपुरात पोहाचेल आणि चंद्रभागा नदीतील हि घाण वाहून जात पुढच्या बंधाऱ्यांच्या ठिकाणी साचून राहणार आहे.आणि पुढील आठ पंधरा दिवसासाठी चंद्रभागा स्वच्छ झाली म्हणून समाधान व्यक्त होईल पण यावर कायम स्वरूपी तोडगा केव्हा निघणार की हा प्रश्न कायम राहणार असा सवाल येथे येणाऱ्या भाविकांनी विचारला आहे.