नेशन न्युज मराठी टिम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – गणेशोत्सवानंतर येणारा नवरात्रौत्सव. अत्यंत उत्साहात संपन्न झाला. एकुण 176 नवरात्रौत्सव मंडळांनी उत्सवाकरिता मंडपाची परवांनगी घेतली होती. यामधील अनेक नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी घ्रटस्थापनेप्रमाणेच माता दुर्गेच्या मूर्तीची स्थापनाही करण्यात आली होती.विजयादशमीच्या नवरात्रौत्सव सांगतादिनी महानगरपालिका क्षेत्रातील 22 मुख्य विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेमार्फत केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये 1198 श्रीदुर्गामूर्ती व घटांचे विसर्जन संपन्न झाले.
यामध्ये – बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 42 घरगुती व 62 सार्वजनिक अशा एकूण 104, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 134 घरगुती व 27 सार्वजनिक अशा एकूण 161, वाशी विभागातील 2 विसर्जन स्थळांवर 66 घरगुती व 17 सार्वजनिक अशा एकूण 83., तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 91 घरगुती व 40 सार्वजनिक अशा एकूण 131, कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 168 घरगुती व 29 सार्वजनिक अशा एकूण 197, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 162 घरगुती व 49 सार्वजनिक अशा एकूण 211, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 50 घरगुती व 24 सार्वजनिक अशा एकूण 74 आणि दिघा विभागात 1 विसर्जन स्थळावर 230 घरगुती व 7 सार्वजनिक अशा अशा एकूण 226 श्री दुर्गामूर्ती व घटांचे ‘अंबे मात की जय’ अशा नामगजरात विसर्जन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील 22 विसर्जन स्थळांठिकाणी गणेशोत्सव विसर्जनाप्रमाणेच आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. परिमंडळ उपआयुक्त यांच्या नियंत्रणाखाली संबंधित विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यासह विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवक, लाईफगार्डस् व अग्निशमन दल विसर्जन सोहळा सुव्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी दक्ष होते. मूर्तींच्या सुयोग्य विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व विसर्जनस्थळांवर पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. सर्व 22 विसर्जन स्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. त्याची वाहतुक स्वतंत्र निर्माल्य वाहनाव्दारे करण्यात आली. या निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस यंत्रणेने केलेल्या नियोजनबध्द आखणीमध्ये नवरात्रौत्सवाचा विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला.