नेशन न्यूज मराठी टीम.
पुणे/प्रतिनिधी -1827 पासून, शौर्य आणि व्यावसायिकतेच्या गौरवशाली इतिहासात भारतीय तोफखान्याचा नेहमीच सन्मानाने उल्लेख आढळला आहे. तोफखान्याने प्रत्येक मोठ्या मोहिमेत अग्रभागी राहून लढा दिला आहे. विजयी मोहीमेत तोफखान्याने दिलेले महत्वपूर्ण योगदान सर्वजण जाणतात.
196 व्या गनर्स दिनानिमित्त भारतीय तोफखान्याचा अग्निबाज विभाग, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांतील जेष्ठ गनर्सना नांदेड, यवतमाळ, नागपूर, अमरावती, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली आणि सोलापूर या प्रमुख 14 ठिकाणी उत्तर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दोन संघांमार्फत संपर्क करण्याचा उपक्रम राबवत आहे. कमांडर शुअर स्विफ्ट स्ट्रायकर्स ब्रिगेड, यांनी कार्यक्रमाच्या मशालीची ज्योत प्रज्वलित करून औरंगाबाद येथून 17 सप्टेंबर 2022 रोजी दोन्ही संघांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
हे दोन संघ अकरा दिवसांनंतर औरंगाबाद येथे पोचतील. त्यानंतर या संपर्क रॅलीचा समारोप औरंगाबाद येथे 28 सप्टेंबर 2022 रोजी एका मोठ्या कार्यक्रमात होईल. हे दोन संघ आपल्या अकरा दिवसांच्या संपर्क रॅली दरम्यान तोफखान्यातील जेष्ठांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी असल्यास त्या तक्रारी आणि गरजा जाणून घेतील. राष्ट्र आणि भारतीय सैन्य त्यांनी दिलेल्या सेवेसाठी सदैव ऋणी राहील अशी ग्वाही देत ही रॅली या ज्येष्ठांबरोबरचे बंध आणखी दृढ करण्यात नक्कीच यशस्वी ठरेल.