वसई/प्रतिनिधी – वसई तालुक्यातील माजीवली येथील बर्फ बनवणाऱ्या ‘डायमंड आईस फॅक्टरी’ या उच्चदाब वीज ग्राहकाकडील वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात महावितरणच्या पथकाला यश आले आहे. रिमोटद्वारे वीजवापर नियंत्रित करणारे सर्कीट बसवून गेल्या 59 महिन्यांपासून या कारखान्याने 4 कोटी 93 लाख 98 हजार 460 रुपये किंमतीची 27 लाख 48 हजार 364 युनिट विजेची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून विरार पोलीस ठाण्यात कारखान्याच्या चार संचालकांसह वीज चोरीची यंत्रणा बसवणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मन्सूरभाई वालजीभाई कानान, शहाबुद्दीन अब्बास समनानी, बदरुद्दीन नानजी ओलचिया, निजार नानजी ओलचिया व एक अज्ञात व्यक्ती अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. माजीवली येथे पारोळा ते भिवंडी रस्त्यालगत ‘डायमंड आईस फॅक्टरी’ हा बर्फ बनवणारा कारखाना आहे. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसई मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण व चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश जाधव यांच्या पथकाने 30 ऑक्टोबरला दुपारी कारखान्याच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. 31 ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत सखोलपणे केलेल्या तपासणीत मीटरकडे जाणाऱ्या तिन्ही सीटीमध्ये प्रत्येक फेजच्या वायरिंगमध्ये काळया, पिवळया व निळ्या रंगाच्या चिकटपट्ट्या गुंडाळून आत इलेक्ट्रानिक सर्किट जोडल्याचे आढळून आले. रिमोट कंट्रोलच्या साह्याने इलेक्ट्रॉनिक सर्किट नियंत्रित करून कारखान्याच्या प्रत्यक्ष वीजवापराची मीटरमध्ये कमी नोंद होईल, अशी व्यवस्था केल्याचे तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झाले. तपासणीच्या वेळी उपस्थित संचालक मन्सुरभाई कानानी यांच्याकडे मागणी करूनही त्यांनी रिमोट कंट्रोल ताब्यात दिला नाही.
बर्फ बनवणारा कारखाना व कारखान्याच्या आवारातील पाच रहिवासी खोल्यांसाठीही विजेचा चोरटा वापर करण्यात येत होता. नोव्हेंबर 2016 पासून ऑक्टोबर 2021 पर्यंत वीजचोरीचा हा प्रकार सुरू होता. वीज कायदा 2003 च्या कलम 138, 135 व 150 अन्वये आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कारवाई करणाऱ्या पथकात अधीक्षक अभियंता चव्हाण, कार्यकारी अभियंता जाधव, उपकार्यकारी अभियंता पराग भिसे, रमेश टाक, सहायक अभियंते विनायक लांघी, योगेश पाटील, वैभव मोरे, हर्षल राणे यांचा समावेश होता. विरार विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी व सहायक विधी अधिकारी राजीव वामन यांनी या कारवाईत सहकार्य केले.
Related Posts
-
माता रमाई स्मृतीदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाच्या उंच शिखरावर नेणारी दिव्य…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
दूधगंगा पतसंस्थेत 80 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oTT-hLXRWxc अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर…
-
गावठी पिस्टलसह ४ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सोलापूर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
डोंबिवलीत मोलकरणीने मारला ४ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - एमआयडीसीच्या निवासी विभागातील डोंबिवली…
-
विनापरवाना साठवणूक केलेले २.३८ कोटी रुपयांचे खत जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या…
-
महाराष्ट्रातील ४ महिला पोलीस अधिकाऱ्यांना कोविड वुमन वॉरियर पुरस्कार
प्रतिनिधी. नवी दिल्ली - कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावलेल्या…
-
३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी
मुंबई प्रतिनिधी- नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू…
-
ठाणे जिल्ह्यात आजअखेर ४ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत ४हजार…
-
जुनी डोंबिवली रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली येथील पश्चिमकडील जुनी…
-
तरुणाची हत्या करणारे ४ सुरक्षा रक्षक पोलिसांच्या तावडीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक…
-
एसबीआयची ८० कोटी रुपयांची फसवणूक, सीबीआयचे खासगी कंपनीवर छापे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय स्टेट बँकेच्या मुंबई…
-
८१७ कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉईस घोटाळा उघड
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई विभागातील सीजीएसटी बेलापूर…
-
मुंबई विमानतळावर विदेशी महिले कडून २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आलेल्या…
-
मुंबई विमानतळावर १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन प्रवाशी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने…
-
२०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन जणाना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी बिले देऊन शासनाचा करोडो…
-
बदलापुरात एकाच दिवशी पकडली १ कोटी १५ लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण मंडल कार्यालय…
-
कोरोना काळातही केडीएमसीच्या तिजोरीत विक्रमी ४२७ कोटी कर भरणा
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत यंदा विक्रमी कर भरणा…
-
१६५ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या प्रकरणी दोन जणांना अटक
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी- महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने…
-
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, विदेशी नागरिकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या…
-
सुमारे ११७.१४ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा,मुंबईत एकला अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून…
-
नोव्हेंबर मध्ये जीएसटीतून १,४५,८६७ कोटी रूपयांच्या महसूलाचे संकलन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नोव्हेंबर 2022 मध्ये…
-
लोकअदालतीतून वीज ग्राहकांची १८७८ प्रकरणे निकाली,२ कोटी ७१ लाखांचा भरणा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - तालुका व जिल्हा न्यायालयात…
-
महाराष्ट्रातील पाच नद्यांच्या संवर्धनासाठी ११८३ कोटी रुपये मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी,…
-
शासनाच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांचा ५ सप्टेंबरला लिलाव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आठ वर्षे…
-
एफएसएसएआय अधिकारी लाचखोरी प्रकरण, सीबीआयला सापडले कोटी रुपयांचे घबाड
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय अन्न सुरक्षा…
-
देशभरात डीआरआयची कारवाई, १९ कोटी रुपयांचे सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाने…
-
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरित करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी…
-
कल्याण परिमंडलात एक कोटी २९ लाखांची वीजचोरी उघड
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - महावितरणच्या कल्याण परिमंडलात गेल्या…
-
मासेमारी करणाऱ्या यांत्रिकी नौकाधारकांना दिलासा,डिझेल परताव्याचे १२ कोटी वितरित करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- राज्यातील यांत्रिकी मासेमारी नौकांना डिझेल परताव्याचे…
-
गडचिरोली जिल्ह्यासाठी २७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन
गडचिरोली/प्रतिनिधी - गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील स्थानिकांना…
-
लोकअदालतीत वीज ग्राहकांची १८२४ प्रकरणे निकाली,२ कोटी ६१ लाखाचा भरणा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - तालुकास्तरावर शनिवारी (०९ सप्टेंबर)…
-
महिला आणि बाल सशक्तीकरण योजनेसाठी ४५० कोटी रुपयांचा निधी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक…
-
५७० कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…
-
बनावट जीएसटी पावत्या जारी करून ११.६१ कोटी रुपयांची फसवणूक, एकाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पालघर/प्रतिनिधी - पालघर आयुक्तालय, मुंबई विभागाच्या…
-
कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक,जेएसडब्ल्यू सोबत सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या…
-
जे.जे. आणि जीटी रूग्णालयांना आधुनिक वैद्यकीय उपकरणांसाठी १९ कोटी रूपये मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - जे.जे. (सर ज.जी.समूह रुग्णालय)…
-
मुंबईत २६३ कोटी रुपयांचा जीएसटी इनव्हॉइस घोटाळा उघडकीस, एकाला अटक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान अभय योजना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - प्रशासनाकडून आर्थिक वर्षाच्या…
-
मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाला
मुंबई/प्रतिनिधी - परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब…
-
आर्थिक वर्षात डिसेंबर २०२२ पर्यंत मालवाहतुकीतून रेल्वेने १२०४७८ कोटी रुपये उत्पन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - गेल्या वर्षी केलेल्या…
-
तटरक्षक दलाच्या ८ जलद गस्ती नौकांच्या बांधकामासाठी ४७३ कोटी रुपये खर्चाचा करार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाने गोवा…
-
मुंबई सीमाशुल्क विभागाने तळोजा येथे ४१० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई सीमाशुल्क विभागाच्या…
-
ऑगस्ट २०२२ मध्ये १,४३,६१२ कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑगस्ट 2022 मध्ये…