नेशन न्यूज मराठी टीम.
रत्नागिरी/प्रतिनिधी – लोकसंख्येसह वाहनांचीही संख्या वाढत आहे. परिणामी, वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन एक ज्येष्ठ नागरिक सायकलवर महाराष्ट्र भ्रमंतीसाठी निघाले आहे. प्रकाश पाटील (वय ६७) असे त्यांचे नाव आहे. पुण्यातील भोसरी येथून त्यांनी २७ ऑगस्टला आपला प्रवास सुरू केला आहे. आपल्या प्रवासात पाटील हे ३६ जिल्ह्यांत भेटी देणार आहेत.
आतापर्यंत त्यांनी १६ जिल्ह्यांचा प्रवास केला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील माती व पाण्याचा संग्रह करून प्रत्येक जिल्ह्यातील एक झाड दत्त टेकडी पुणे येथे लागवड करण्याचाही पाटील यांचा संकल्प आहे. पुणे येथून २७ ऑगस्टला सायकलने निघालेले ६७ वर्षीय प्रकाश पाटील ६ हजार किमीचा प्रवास करून हा संकल्प पूर्ण करणार आहेत. भावी पिढीनेही आपल्या जीवनशैली मध्ये सायकलला महत्व द्यावे तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.