नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासकीय नोकर भरती देखिल कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला जातोय. त्याच धर्तीवर आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, शासकीय आणि नीम शासकीय जागा मध्ये पन्नास टक्के जागा या रिक्त आहेत या जागा कायम स्वरुपी भरण्या साठी सरकार कडे पैसे नाहीत कारण सरकार दिवाळं खोरीत गेले आहे. त्यामुळे सरकार ने या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र कंत्राटी पद्धतीने जागा भरताना अनेक मर्यादा असतात. हे लोक कायम नसल्याने बंधन नसल्याने ते मन लाऊन काम ही करत नाही, त्यामुळे काही ठिकाणी कंत्राटे पद्धतीने काम देणं ठीक असले तरी सर्वत्र मात्र कंत्राटी पद्धतीने काम देणे आणि त्यावर जबाबदारी देणे योग्य नाही.
उद्याच्या काळात मंत्री मंडळ ही आता कंत्राटी पद्धतीने चालवावे.आणि दर महिन्याला नवीन नवीन भरती करावी. कायम स्वरुपी मंत्री मंडळाची आणि पाच वर्षे आणि तीन वर्ष साठी गरजच काय ? असा सवाल करून एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकार वर टीका केली आहे.