महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य

आठ वर्षीय चिमुकली कोरोनावर भारी रुग्णालयातून मिळाली सुट्टी

प्रतिनिधी .

बुलडाणा दि. २३ – सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील आठ वर्षीय चिमुकली मुंबई येथे कोरोना बाधित झाली. तिच्यावर मुंबईत एका रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून मलकापूर पांग्रा येथे दाखल होताच या चिमुकलीला बुलडाणा येथे कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले. या चिमुकलीने कोरोनाशी चिवट झुंज देत कोरोनावर मात केली. तिची आज कोवीड केअर सेंटर येथून सुट्टी करण्यात आली. त्यामुळे सिंदखेड राजा तालुक्यात सध्यातरी कोरोना हद्दपार झाला आहे.
जिल्ह्यात एकूण ३६ कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी आज पर्यंत २५ रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर येथील चार, खामगाव तालुक्यातील दोन, शेगाव येथील तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील 2, देऊळगाव राजा येथील दोन, चिखली येथील तीन, बुलढाणा येथील ८ व जळगाव जामोद येथील एक अशाप्रकारे २५ रुग्णांचा समावेश आहे. तसेच तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मलकापूर पांग्रा येथील चिमुकलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. यावेळी डॉक्टर्स, नर्सेस व ब्रदर्स यांनी चिमुकलीचे टाळ्या वाजवून स्वागत केले. चिमुकलीला मोठ्या आनंदाने निरोप देण्यात आला. शासनाच्या रुग्णवाहिकेतून मलकापूर पांग्रा येथे घरी सोडण्यात आले. यावेळी चिमुकलीच्या पालकांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या काळजीबद्दल आभार व्यक्त केले.

Related Posts
Translate »