Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
कृषी लोकप्रिय बातम्या

क्रॉप कव्हर घालूनही केळीच्या रोपांवर उन्हाचा दुष्परिणाम

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – यावर्षी राज्यात तापमानाचा पारा 45 अंश पार पोहचला आहे. वाढत चाललेल्या तापमानाचा मारा पिकांवर झाल्यामुळे शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा यावल रावेर या तालुक्यात केळी व पपईची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत असतात. हा पट्टा केळी व पपई उत्पादनासाठी ओळखला जातो. या रखरखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी चोपडा तालुक्यात जवळपास हजारो एकर जमिनीवर पिकांच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हर व सन पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सन पिकाची लागवड केली. सन पीक पंधरा दिवसाचे झाल्यानंतर केळीच्या रोपांची लागवड केली. त्याला क्रॉप कव्हर देखील लावले परंतु केळीचे पान नाजूक असल्याने लखलखत्या उन्हापासून त्या केळीच्या पिकावर त्याचा परिणाम झाला. जवळजवळ शंभर केळीचे रोप ह्या उन्हामुळे मेले. त्याच जागेवर पुन्हा शंभर केळीची रोप लागवड करावी लागली. केळीच्या संरक्षणावर 40 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यात वीज नसल्याने पाणी देण्यासाठी देखील कधीकधी विलंब होत असतो. अशी प्रतिक्रिया केळी उत्पादक शेतकरी साहेबराव माळी यांनी दिली आहे. या कडक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करून धडपड करावी लागत असल्याचे दिसत आहे.

Translate »
X