नेशन न्यूज मराठी टीम.
वर्धा / प्रतिनिधी – वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालूक्यातील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात कडधान्यापासून व शेतमाल यापासून विशेषतः तांदूळ, चणा, उडीद, मूग, कापूस, लोकर, घरातील वापरात नसलेले मनी, मोती, पंधरा धागा या साहित्यातून पर्यावरणपूरक राख्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी तयार केल्या आहेत.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्या अर्चना मुडे, सचिव योगेश खोडे, पर्यवेक्षक मनोहर पावडे, सायन्स विभाग प्रमुख डॉ. निलम खोडे, तसेच मगन संग्रहालय वर्धा येथील समन्वयक सौ. सुषमा सोनटक्के यांच्या पार पडला. यानंतर सुषमा सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तू व शेतमालापासून राख्या कशा तयार करायच्या याची प्रात्यक्षिके करून दाखविली.
विद्यार्थिनींनी देखील सोबत आणलेल्या वस्तुंपासून राख्या बनविण्यास सुरुवात केली. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून जवळपास 100 पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. शेतकऱ्यांच्या मुलींनी आपल्या उत्पादनातून राख्या तयार केल्या याचा आनंद आई वडिलांना झाला.