नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड/प्रतिनिधी – 4 ऑक्टोबर रोजी खासदार हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना त्वरित अटक करावी. कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे त्यांनी षडयंत्र आखले आहे की काय? असा सवाल युवा पॅंथर संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
जे काही सरकारी हॉस्पिटलमध्ये घडले आहे त्यासाठी राज्य सरकार व आरोग्य मंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा. सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या नातेवाईकांचे सहयोग नावाने यंत्रणा आहे. दवाखान्यासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा त्या ठिकाणी आहेत .व सरकारी दवाखान्यातील पेशंटला बाहेरून औषधे, रक्तपुरवठा, एमआरआय, सिटीस्कॅन व सर्व तपासण्या हे त्यांच्या सहयोग नावाने चालू केलेल्या सर्व यंत्रणेमध्ये जाऊन कराव्या लागतात त्यामुळे याची देखील चौकशी व्हावी अशी देखील मागणी युवा पॅंथर संस्थापक राहुल प्रधान यांनी केली आहे.