नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई /प्रतिनिधी – प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी श्रीनिवास यांचे स्वागत करुन प्रशासकीय सुधारणांच्या क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. राज्यात सुप्रशासन विषयक मार्गदर्शिका (गुड गव्हर्नन्स मॅन्युअल) तयार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना देतानाच देशात सुप्रशासन निर्देशांकात द्वितीय क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल, शिवाय कामकाज संपूर्णपणे कागदविरहीत (पेपरलेस) होणार असल्याने अधिक सुलभता येणार आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून राज्याच्या सर्व कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सर्व कार्यालये ‘ई-ऑफिस’ वापरू लागले की मोबाईलवर देखील कामकाजाच्या फाईल्स, कागदपत्रे पाहता येतील, त्याला मान्यता देता येणार आहे.
फाईल्सचा प्रवास होणार कमी
सध्या मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी येणारी फाईल ८ विविध स्तरांमधून येते, या अधिकच्या स्तरांमुळे संबंधित विषयांच्या फाईल्सवर निर्णय होण्यास विलंब लागतो, म्हणून गतिमान कारभारासाठी फाईल्स सादर करण्याचे स्तर कमी करण्याच्या सूचना देतानाच फक्त चार स्तरांवरुनच फाईल मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
ऑनलाईन सेवांची संख्या वाढणार
ई-सेवा निर्देशांकात देखील महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी जास्तीत-जास्त सेवांची संख्या वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. सध्या राज्यातील ४५० सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत.
सार्वजनिक तक्रारींवरील कार्यवाहीचा मुख्यमंत्री स्वतः घेणार आढावा
हे जनतेचे सरकार असून सर्वसामान्यांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षापूर्तीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या सार्वजनिक तक्रारींच्या निवारणासाठी ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. या तक्रारींचे डिजिटल ट्रॅकिंग करण्यात येईल, तक्रारींवर विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी एक स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात येणार आहे. या सार्वजनिक तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा स्वतः आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.
आता प्रत्येक विभागांची आणि जिल्ह्यांची होणार ‘गुड गव्हर्नन्स रॅंकिंग’
सध्या महाराष्ट्रात फक्त राज्यस्तरावर सुशासन पद्धतीचे पर्यवेक्षण होते, आता शासनाच्या प्रत्येक विभागांची आणि जिल्ह्यांची गुड गव्हर्नन्स रॅंकिंग केली जाणार आहे. शासकीय विभाग आणि जिल्ह्यांच्या प्रशासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवांची, सुशासनाची क्रमवारी निश्चित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या सुशासनाच्या क्रमवारीमुळे विभागांमध्ये आणि जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईलच, शिवाय जनतेला मिळणाऱ्या सेवांचा दर्जा वाढेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
अभिनव, नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या यशोगाथांचे संकलन
राज्याच्या प्रशासनात सुरू असलेल्या अभिनव, नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या यशोगाथांचे संकलन केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विशेष कार्य केलेल्या ५० प्रयोगांची निवड केली जाणार असल्याचे सचिव श्री. श्रीनिवास यांनी सांगितले.
Related Posts
-
आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिन्ह सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर
मुंबई/प्रतिनिधी- सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो)…
-
राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची लालपरी धावणार
मुंबई/प्रतिनिधी - आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची…
-
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या…
-
शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नांदेड/प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र…
-
शहीद बडोले यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत
नागपूर प्रतिनिधी - जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले यांच्या कुटुंबीयांना आज ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग संदर्भात आढावा…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्य शासकीय व इतर…
-
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता
मुंबई/प्रतिनिधी - एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर…
-
राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे ७ ऑक्टोबरपासून होणार खुली
मुंबई/प्रतिनिधी - नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना…
-
जवान विकी चव्हाण यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र भारतीय…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
कल्याणात राज्यातील तृतीय पंथीयासाठीचे पहिले निवारा केंद्र
कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यात लोकलमध्ये मांगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक…
-
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १,३५१ उमेदवार रिंगणात
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लोकशाही असलेल्या…
-
राज्यातील कंत्राट भरती विरोधात वंचितचा आंदोलनाचा इशारा.
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य सरकारने…
-
महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रधानमंत्री भारतीय जन…
-
राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री यांची सूचना
प्रतिनिधी . मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी…
-
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांच्या वेतन निश्चितीचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सरळ सेवेने किंवा थेट नियुक्त…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
वीर जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - ‘अमर रहे…, अमर रहे… वीर…
-
राज्यातील शिक्षकांच्या नावा पुढे लागणार टीआर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - शिक्षक आपल्या समाजातील…
-
सोलापूर शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, तरुणाच्या मृतदेहाला लागल्या मुंग्या
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील टीबी…
-
जुन्या पेन्शनसाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोर नर्सिंग असोसिएशनतर्फे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - जुनी पेन्शन योजना लागू…
-
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित…
-
नांदेड शासकीय रुग्णालय मृ-त्यू प्रकरणी शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - नांदेड येथील शंकरराव चव्हाण…
-
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या…
-
राज्यातील ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई /प्रतिनिधी - शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा…
-
राज्यातील साखर कामगारांची दिवाळी गोड
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी…
-
मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई…
-
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये…
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
१२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय…
-
कोंकण विभागातील ७ सरपंच, १ उपसरपंच, १ सदस्यावर अपात्रतेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - कोकण विभागातील एकूण 7…
-
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ हजार लिटर सॅनिटायझर आणि १.५ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप
प्रतिनिधी . डोंबिवली - सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे.…
-
शासन शब्दकोश भाग-१ आता गुगल प्लेवर उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त शब्द…
-
राज्यातील वाळू, रेती उत्खननाबाबत नवीन धोरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नदी व खाडी…
-
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार
प्रतिनिधी. मुंबई- राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे…
-
मुंब्रा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंब्रा येथील शासकीय तंत्रनिकेतन…
-
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - बऱ्याचदा मेडिकल…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६०.२२ मतदानाची नोंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या…
-
शॉक सर्किटमुळे पुन्हा शासकीय रुग्णालयात आग
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात…
-
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण
मुंबई/ प्रतिनिधी - देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण…
-
शासकीय बँकींग व्यवहार मर्यादित प्रमाणात खासगी बँकांना हाताळण्यास परवानगी
प्रतिनिधी. मुंबई - खासगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकींग व्यवहार…