कल्याण/प्रतिनिधी – कल्याण लोहमार्ग पोलिसानी सराईत तडीपार चोरट्याला शहाड रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशाचे पाकीट चोरून पळून जाण्याचा प्रयत्नात असताना रंगेहाथ अटक केली आहे. फज्जू उर्फ इमरान सय्यद अस या चोरट्याच नाव आहे .
शनिवारी सकाळच्या सुमारास चेतन जाधव हा इसम लोकलने कल्याण ते शहाड दरम्यान प्रवास करत होता .याच दरम्यान त्यांच्या डब्यात फज्जू उर्फ इमरान होता.लोकल शहाड स्टेशन वर येताच इमरान ने डाव साधत जाधव यांना धक्का देऊन त्यांच्या खिशातील पाकीट चोरले व प्लॅटफॉर्म वर उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला .पाकीट चोरल्याचे जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला यावेळी प्लॅटफॉर्म वर ड्युटीवर असलेल्या कल्याण लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांचे व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचे लक्ष गेलं त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत फज्जूचा पाठलाग करत त्याला अटक केली .या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात फज्जू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय .दरम्यान फज्जू उर्फ इमरान हा सराईत चोरटा असून त्याच्या विरोधात कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात 7 गुन्हे दाखल असून इतर पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत ,24 फेब्रुवारी 2020 सालापासून त्याला मुंबई ,मुंबई उपनगर ,ठाणे ,रायगड पालघर जिह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार तडीपार करण्यात आले होते. सामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी २ डोसची अट असताना चोरटे रेल्वेत प्रवास कसे करतात असा प्रश्न सामान्य नागरिक विचारात आहेत.
- September 12, 2021