Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पावासामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांची उडाली तारांबळ

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

पंढरपूर/प्रतिनिधी – उन्हाळा संपायला काही दिवस बाकी असले तरी राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच नेहमीप्रमाणे पाण्याचा निचरा न झाल्याने नगरपरिषदेचा मोठा निष्काळजीपणा समोर येत आहे. कारण पावसाळा सुरू व्हायच्या आधी नाले तसेच ज्या ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता असते अशा ठिकाणाची कामे नगरपरिषदेने आधी आटपून घेणे गरेजेचे आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या देवस्थानांपैकी एक असलेल्या पंढरपुरातील वारीला आता काही दिवसच बाकी राहिले आहेत. पण अजूनही प्रदक्षिणा रस्त्यावरील बंकट स्वामी मठ ते बेलीचा महादेव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पंढरपूर शहरात शासन विकास कामांसाठी निधी कमी पडू देत नाही. नगरोत्थान योजना असो अथवा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अथवा विशेष बाब म्हणून शासन पंढरपूर नगर पालिकेस भरभरून निधी देत आले आहे. यातूनच शहरातील प्रदक्षिणा रस्त्यासह मागील दोन तीन वर्षात अनेक कामे करण्यात आली. शहरातील प्रदक्षिणा रस्त्याच्या डांबरीकरणाचे जवळपास सव्वा दोन कोटींचे काम नगर पालिकेने पाच तुकड्यात टेंडर काढून पाच वेगवगळे ठेकेदार नियुक्त करून केले होते. त्याच वेळी शहरातील नागरिकांनी आधी प्रदक्षिणा मार्गावर पाऊस पडल्यानंतर जागोजागी अगदी गुडघ्यापर्यंत पाणी साठून राहते, तासनतास या पाण्याचा निचरा होत नाही. ही बाब निदर्शनास आणून दिली होती. नगर पालिकेने सुद्धा नेहमीप्रमाणे वारीच्या तोंडावर कामे काढून हे काम पूर्ण करून पाठ थोपटून घेतली होती.

प्रदक्षिणा रस्त्यावरील बंकट स्वामी मठ ते बेलीचा महादेव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत असल्याचे मागील २ वर्षांपासून दिसून येत आहे. मात्र यावेळी अगदी पहिल्याच मोठ्या पावसात हाच अनुभव पुन्हा एकदा आला. मर्जीतील ठेकेदार सांभाळण्यासाठी नगरपालिका निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कामाकडे दुर्लक्ष करते, अशी टीका वारंवार होत आली आहे. आता झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसात बंकट स्वामी मठ ते बेलाच्या महादेव रस्त्यावर जी परिस्थिती उदभवली आहे ती पावसाळा संपेपर्यंत बहुतेक कायम राहू शकते. ही समस्या कायमची दूर केली जाणार का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

Translate »
X