नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
नंदुरबार प्रतिनिधी – घरोघरी स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणावर लसणाचा वापर केला जातो.लसूण हा स्वयंपाकघरातील एक महत्वाचा घटक आहे.नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यापूर्वी 400 रुपये किलोने मिळणारा लसणाचा दर आता घसरला असून आता 160 ते 200 रुपये किलोने लसूण विक्री होत आहे.लसणाचे दर वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गणित बिघडलं होतं परंतु आता लसणाचे दर उतरल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.पण त्याचबरोबर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला फार अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लसूण उत्पादक शेतकाऱ्यांमध्ये काहीसा नाराजीचा सुर दिसून येत आहे.
लसणाचा दर वाढला असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळाले होते परंतु आवक वाढल्याने लसणाचे दर पुन्हा घसरले आहेत. मार्केटमध्ये गावरान लाल लसूण ,पांढरा लसूणची रोज 100 ते 300 क्विंटल पर्यंत आवक होत आहे. ज्या प्रकारे माल असतो त्या प्रकारे लसणाचा भाव आहे.लसूण हा वर्षातून एकदाच निघणारे पीक असल्याने त्याचा भावात चढ-उतार होत असतो.
दिवाळीमध्ये लसणाची लावणी करण्यात येते त्यामुळे या वेळी बाजारात लसूण उपलब्ध नसल्याने जो काही साठवलेला लसून बाजारात येतो त्याला चढा भाव मिळतो. त्यानंतर संक्रांतीनंतर नवीन लसूण बाजारात उपलब्ध होत असल्याने लसणाचे भाव हे कमी होत असतात. आता लसणाच्या काढणीला वेग आला असल्याने आणखी दर घसरण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.साधारणता पुढील महिनाभर हाच दर कायम राहील परंतु जून महिन्यात सीजन संपल्यानंतर पुन्हा भाव वाढण्याची शक्यता देखील व्यापऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.